शैक्षणिक उपक्रम

उद्देश

आपला भारत देश हा १३५ कोटी लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्यात सुमारे ६५ टक्के जन हे ४५ व त्याहून खाली वयोगट असलेले आहेत. म्हणजेच आपला भारत देश हा एक तरुण देश आहे आणि हीच तरुण पिढी ही आपल्या भारताचे भविष्य ठरवणारी आहे. देशाला सर्वांगाने जर ‘समृद्ध, सुजलाम-सुफलाम’ आणि प्रगतीच्या मार्गावर न्यायचे असेल तर तरुण पिढीचे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणे व सतत प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचा करता, ज्या देशात आपण राहतो त्या देशा करता आणि आपला स्वधर्म चोख पार पाडण्याकरिता योग्य ती जीवनमूल्ये त्यांच्यामध्ये अंगी बाळगणे फार महत्वाचे आहे.
बाहेर निरनिराळे आमिषे आहेत; तरुण पिढी वाईट मार्गाला सहजरीत्या आकर्षित होऊ शकते. ते टाळण्याकरिता आणि त्याच बरोबर आपल्या भारतीय संस्कृतीचे, आपल्या आध्यात्मिक समृद्धीचे या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने ओळख पटावी आणि अध्यात्म हे साठीनंतर करणारी गोष्ट नव्हे तर आपल्या प्रत्येक दैनंदिन गोष्टीत असते हे त्यांना समजावून देणेगरजेचे आहे. श्रीमद भगवत गीतेत सांगितले आहे, ‘योगः कर्मसु कौशलम्‘,. द्वारे डोळसपणे अध्यात्म करण्याचे शिकवून त्यांना आपल्या भारत देशाचे एक जवाबदार नागरिक बनवणे हा यामागचा हेतू.
आणि पण हे योग्य शैक्षणिक उपक्रमाने द्वारे शक्य आहे.म्हणून प्रतिष्ठानच्या अंतर्गत शैक्षणिक विभाग सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत

या अंतर्गत :
१) व्यक्तिमत्व विकास संस्कार शिबिर
२) व्यक्तिमत्व विकास संस्कार वर्ग
३) ​शाळा, महाविद्यालयातून PPT द्वारे session

व्यक्तिमत्त्व विकास संस्कार वर्ग

व्यक्तिमत्त्व विकास संस्कार शिबीर

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने

प्रतिष्ठानबद्दल


कार्तिक कृ.१३ दि.२४ डिसेंबर २०१९ रोजी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी दिन, या महत्त्वपूर्ण तिथीचे औचित्य साधून आपण ‘ज्ञानसेवा प्रतिष्ठान’ ही संस्थेची स्थापना केली. संस्थेचे प्रेरणास्थान आहेत, वै.प.पू.गुरुजी श्री अरविंदनाथ महाराज रनाळकर.

संपर्क

info@dnyansevapratishthan.com


091379 80993/ 7034436132
083693 26995/7045536132

34, लक्ष्मी नारायण, डीएनसी रस्ता, प्रगती महाविद्यालयासमोर, डोंबिवली (पूर्व)