ज्या समाजात आपण जन्माला येतो, वावरतो आणि विकसित होतो त्या समाजाचे आपण ऋणी असतो. अशा समाजातील सर्वच घटकांप्रति कृतज्ञतेच्या बांधिलकीतून आपण सामाजिक प्रकल्प विभाग सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत आपण सामाजिक समस्या निवारण्यासाठी विविध उपक्रम राबवितो.
१)- आपण समाजाचे देणे लागतो ही जाणीव वृद्धिंगत व्हावी व त्यागाची भावना विकसित व्हावी यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन.
२)- अनियमित वृक्षतोड व परिणामी होणारी पर्यावरणाची हानी पूर्णतया भरून काढता येत नसली तरी ‘झाडे लावा झाडे जगवा’ या विचाराने प्रेरीत होऊन सामाजिक वनीकरण.
३)- महापुरामुळे झालेली जीवित व वित्तहानी यातून काही दिलासा मिळावा म्हणून पूरग्रस्तांना मदतीचा हात.
४)- शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप.
५)- आदिवासी पाड्यांतील बांधवांना तेथील परिस्थितीनुसार कपडे आणि लहान मुलांना पोषक आहारासाठी मदत.
६)- अनाथाश्रमातील मुलांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी वस्तूरूपाने मदत.
७)- वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांना मानसिक आधार.
कल्याण डोंबिवली पोलीस, अनुलोम व ज्ञानसेवा प्रतिष्ठान यांनी केलेले वृक्षारोपण
रक्तदान शिबीर
गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना मदत
वारीदरम्यान वारकऱ्यांकरिता वैद्यकीय सेवा
पुरग्रस्थांना मदत
अंबरनाथ येथील आनंद अनाथाश्रम यांना मदत

प्रतिष्ठानबद्दल
कार्तिक कृ.१३ दि.२४ डिसेंबर २०१९ रोजी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी दिन, या महत्त्वपूर्ण तिथीचे औचित्य साधून आपण ‘ज्ञानसेवा प्रतिष्ठान’ ही संस्थेची स्थापना केली. संस्थेचे प्रेरणास्थान आहेत, वै.प.पू.गुरुजी श्री अरविंदनाथ महाराज रनाळकर.
संपर्क
info@dnyansevapratishthan.com
091379 80993/ 7034436132
083693 26995/7045536132
34, लक्ष्मी नारायण, डीएनसी रस्ता, प्रगती महाविद्यालयासमोर, डोंबिवली (पूर्व)























